शरद भेंडे
ग्रामीण प्रतिनिधि
करोना तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असताना शासनाकडून 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांच्या कोरोना प्रतिबंधित लसीकरणाला पिंप्री खुर्द येथील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे राज्यभरात 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांची लसीकरण मोहीम सुरू झाली असून त्यासाठी आरोग्य विभागाने विशेष काळजी घेत आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे अशातच श्री तुकाराम शिरसाट विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधित लसीकरण मोहिम संपन्न झाले या शिबिरामध्ये 66 मुले मुलींना लसीचा पहिला डोस देण्यात आला लसीकरण वैद्यकीय पथकामध्ये डॉ. शारदा भिर्डे डॉ.इकबाल. आरोग्य सेवक अंबलकार डॉ. खोडके.आशा मायावती जवंजाळ.ज्योती होम. अटेंडन् इंदिरा अंभोरे.विकी मांनमोडे यांनी सहभाग घेतला होता लसीकरण शिबिराला तुकाराम सिरसाट विद्यालयाचे मुख्याध्यापक पडोळे सर .सपकाळ सर. आमले सर.बंडुभाऊ रोहणकार लक्ष्मण भेंडे. हे उपस्थित होते