सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली : जिल्ह्यातील भामरागड तालुका हे अतिदुर्गम डोगरांळ आदिवासी भाग म्हणून प्रचलीत आहे.भामरागड येथे पर्लकोटा,पामुलगौतम व इंदावती या तिन नद्यांचा संगम अाहे.तसेच तालुक्यात बिनागुंडा येथे धबधबा आहे.संगम व धबधबा पाहण्याकरिता दुरदुरवरून दररोज हजारो पर्यटक येथे येत असतात.परत जातांना माञ अनेक पर्यटक ताडीचा चव घेतल्याशिवाय जात नाहीत.तालुक्यातील आदीवासी समुह हा फारच गरीब असल्यामुळे या भागात रोजगाराचे सांधन उपलब्ध नाही.आर्थीक रोजगार मिळविण्यासाठी आदीवासी भागातील अनेक नागरिक शहरात स्थलांतरीत करीत आहे.अशातच ताडीचे झाडे त्यांच्यासाठी रोजगाराचे वरदान ठरले. भामरागड तालुक्यामध्ये जवळपास 125 गावे आहेत. प्रत्येक गावामध्ये ताडीचे झाडे भरपुर प्रमाणात आहे. ताडी हे ताडफळापासून तयार केले जाणारे पेय आहेत ताडीच्या झाडास माथ्यावर तीक्ष्ण हत्याराने खाच पाडल्यावर त्यातुन निघणारा रस हा रस त्या केलेल्या खाचेखाली मडके बांधून त्यात गोळा करतात.हा रस प्रकृतीने थंड असतो सूर्योदय झाल्यावर हा आंबतो त्यापूर्वीच हा पिणे योग्य असतो.या रसाने मूत्रप्रवृत्ती वाढते उन्हाळ्यात हा पिण्याने उन्हाचा त्रास होत नाही. ताडी हे ताडफळापासून तयार केले जाणारे पेय आहे. त्यापूर्वीच हा पिणे श्रेयस्कर असते. या रसाने मूत्रप्रवृत्ती वाढते उन्हाळ्यात हा पिण्याने उन्हाचा त्रास होत नाही. ताडीपासून गूळ व साखरही बनते ताडी आंबल्यावर पहिल्या 3 ते 8 तासात तिच्यात 3 टक्के एथिल अल्कोहोल बनते ही प्रक्रिया चालू राहिल्यास अल्कोहोल 5 टक्क्यापर्यंत वाढते त्याहून अधिक झाल्यास ताडी माणसाने पिण्याच्या लायकीची राहत नाही. ताडीचे दोन प्रकारचे झाड असतात आणी दिवसातुन तिन वेळा सकाळ दुपार व संध्याकाळ ताडी काढल्या जाते.त्यात नर झाडाची ताडी गोड असते.हि ताडी सहकुटुंब पिता येते थोडिशी नशा येते सकाळचे ताडी असेल तर नशा मुळीच येत नाही सकाळची ताडी नारळाच्या पाण्यासारखी गोड असते.मादी झाडाची ताडी आंबट असते हि ताडी पितात याने नशा तर येतेच असं म्हणतात.हि ताडी पर्यटकाचे आवडते पेय बनले आहे त्यामुळे अशी बहुगुणी ताडी भामरागड परिसरात रोजगाराचे साधन बनले आहे.अशी माहीती भामरागड येथील डाॅ. कैलास व्हि. निखाडे निर्सग अभ्यासक यांनी दिली आहे.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)