पुणे : कुलमुखत्यारपत्र करून दिलेल्या जमीन मालक व्यक्तीचा मृत्यू झाल्यावरही तो जिवंत असल्याचे दाखवून जागा नावावर करून बळकावल्याच्या प्रकरणात प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा, पुत्र कुश सिन्हा यांच्याविरोधात संदीप दाभाडे यांनी जिल्हाधिकारी व दुय्यम निबंधक कार्यालयात नव्याने तक्रार दाखल केली आहे.