अकोला – राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांना आर्थिक मदतीसाठी मुदतठेव प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
जिल्हा नियोजन भवनात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, विधान परिषद सदस्य आ. ॲड.किरण सरनाईक, विधानसभा सदस्य आ. गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आ.हरीश पिंपळे, आ. रणधीर सावरकर, आ.नितीन देशमुख तसेच जिल्हाधिकारी निमा अरोरा, पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुभाष पवार, उपजिल्हाधिकारी रोहयो बाबासाहेब गाढवे , निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे तसेच अन्य विभागप्रमुख उपस्थित होते.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)