किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
आगळी वेगळी ‘गायपंगत’ यात्रा उत्साहात संपन्न”
पातुर : ग्राम शिर्ला (अंधारे) ता. पातुर येथील आगळी वेगळी गायपंगत यात्रा उत्साहात संपन्न झाली. येथील गाडगे घराण्याची ही अनोखी परंपरा आजही गोपूजनाने अन् सहभोजनाने मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यात्रा गावकऱ्यांना ऊर्जा देऊन जाते.गावच्या लेकी माहेरी येऊन मोठ्या भक्तिभावाने आनंदाच्या धनी होतात. बालगोपाल अन् ज्येष्ठांसाठीही ही आनंद पर्वणी असते दत्तजयंतीच्या दुसऱ्या दिवशी सदर सोहळा संपन्न होत असतो. या पर्वणीमध्ये श्रीमदभागवत अन रात्री कीर्तन यामुळे गावात भक्तिमय वातावरण निर्मिती झाली.सोमपुरी महाराज मित्र मंडळ, गावकरी मंडळी यांनी रामायणाचार्य महादेव महाराज निमकंडे यांचे नेतृत्वात संगीतमय भागवत कथेची सानंद सांगता झाली. सोमपुरी महाराज ज्येष्ठ नागरिक संघाने त्यांना साथ दिली. ह.भ.प गोपाल महाराज रेवस्कर यांचे काल्याचे किर्तनाने व महाप्रसादाने सोहळ्याची सांगता झाली.