डॉ. अंकुश आगलावे
महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.१२:-खेळांमुळे शारीरिक व मानसिक विकास होतोच, शिवाय करियर म्हणून खेळल्यास अव्वल खेळांडू प्रशासनात उच्च पदावर नियुक्त होत असतात. कबड्डी खेळांडूसाठी अनेक संधी उपलब्ध होत असून खेळांकडे मनोरंजन म्हणून न पाहता त्यातून आपले भविष्य घडवा असे आवाहन केंद्रीय मानवाधिकार संगठन नवी दिल्लीचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष डॉ.अंकुश आगलावे यांनी कब्बड्डी सामन्या दरम्यान वरोरा तालुक्यातील शेंबळ येथे जय श्रीराम क्रीडा मंडळाव्दारे कबड्डी सामन्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मानवाधिकार संगठन, नवी दिल्लीचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष डॉ.अंकुश आगलावे होेते.डॉ. आगलावे आपल्या अध्यक्षीय भाषणात पुढे म्हणाले की, खेळांमुळे सुप्त गुणांचा विकास होतो. याशिवाय बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण होत आहे. तसेच भास्कर पेरे पाटील यांचा आदर्श घेवून गांव आदर्श करणे गरजेचे आहे. गावाचा विकास हा ग्रामसभेच्या माध्यमातूनच होईल असेही ते म्हणाले. तसेच गुरूदेव सेवा मंडळाचे प्रचारक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राजकारणात आले पाहिजे व राजकारण न करता समाजकरण केले पाहिजे असे ही यावेळी डॉ. आगलावे यांनी सांगितले. वरोरा तालुक्यात स्वयंरोजगाराकरीता शिबीरे लावून रोजगार निर्मिती करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. शेतकरी आत्महत्या का करत आहेत यावर चिंतन करणे गरजेचे असून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून मुबलक प्रमाणात पीक घेतल्यास आत्महत्येचे प्रमाण कमी होणार. तसेच १४ व १५ व्या वित्त आयोगातून पांदन रस्त्याचा विकास झाला पाहिजे.असेही त्यांनी यावेळी सांगितले.या कार्यक्रमाला अहेतेशामजी अली, नरेंद्रजी जीवतोेडे, योगिताताई लांडगे, नरेशबाबु बोरा,राजेशजी शर्मा, अमोलजी मुथा, राजुभाऊ गायकवाड, मुकेशजी जीवतोडे, नितीनभाऊ मत्ते, देविदासजी ताजने, गुलाबराव ताजने, रमेशजी राजुरकर, हेमंत खापने, राजेंद्र गोवारदिपे, कासिफ खान, शुभम चांभारे, रवि इंगोले, गजानन खिरटकर, बालाजी जीवतोडे, ज्योतीताई मेश्राम, महादेव घागी, प्रफुल उमरे, महादेवराव जीवतोडे, प्रदीपजी मत्ते, अरूण खारकर, अण्णाजी खडसे, विनोद मत्ते, खंडाळकर सर व शेबळ गावांतील ज्येष्ठ नागरीक, जिल्हयातील कबड्डी संघ, नागरिक व युवक मोठया संख्येने उपस्थित होते.











