२५ हजारांची स्वीकारली लाच
महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.१२:-नुकतेच दोन महिन्यांपूर्वी येथील तहसील कार्यालयात रुजू झालेले तहसीलदार डॉ.नीलेश खटके आज दि.११ डिसेंबर रोजी दुपारी २५ हजारांची लाच स्वीकारताना ए.सी.बी.च्या जाळ्यात अलगद अडकले. प्राप्त माहितीनुसार, येथील एका इसमास विटा भट्टीसाठी लाल मातीची आवश्यकता होती. त्यासाठी लाल मातीच्या उत्खननासाठी तहसीलदार डॉ.नीलेश खटके यांची यांची परवानगी हवी होती. परवानगीकरीता डॉ.खटके यांनी सदर इसमास २५ हजारांच्या लाचेची मागणी केली. परंतू सदर इसमाची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने थेट नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून तहसीलदार खटके यांना त्यांच्याच कार्यालयात २५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली. तहसीलदार खटके दोन महिन्यांपूर्वीच पोंभुर्णा येथून बदली होऊन भद्रावतीत रुजू झाले होते. त्यांच्या अटकेने महसूल विभागात एकच खळबळ माजली आहे.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)