किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : तालुका विकास मंचाचे सक्रीय सदस्य असल्याचा आम्हाला अभिमान… ठाकूर शिवकुमारसिंह बायस
अकोला येथील गजानन महाराज मंदीर येथे आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमात पातुर तालुक्यातील विवरा येथे राहणाऱ्या व रूग्णांचा तारण हार नव्हे तर त्यांना जीवदान देणारा देवदुत म्हणून ज्यांनी आपली स्वत:हाची वेगळी ओळख निर्माण केली आहे असा अवलिया ज्याने दुर्धर आजारासाठी अनेक रूग्णांना मुबंई येथे नेवून लाखों रूपये आपरेशनचा खर्च येणा-यांना विविध धर्मादायाचे काम करणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून लाखोंचा निधी उपलब्ध करून दिलासा तर दिलाच सोबत जीवदान ही दिले आहे. अशा महामानवाचा सत्कार सप्त खंजेरीवादक सत्यपाल महाराज व उपजिल्हाधिकारी प्रा.संजय खडसे यांच्या हस्ते करण्यात आला सत्यपाल महाराज यांनी त्यांच्या शब्दवाणीतुन मंगेश केनेकर यांच्या विषयी बोलण्यासाठी शब्द अपुरे पडतात असे गौरवोद्गार काढत यांच्या सारखे कर्मयोगी जन्माले येणे म्हणजे आई वडिलांच खुप मोठं भाग्य आहे अशा माणसांचा गौरव समाजात होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.निवासी उपजिल्हाधिकारी यांनी सुद्धा मंगेश केनेकर यांच्या कार्याचे गुणगान करून त्यांना कोरोना योध्दा म्हणून संबोधीत केले. याप्रसंगी रूग्णसेवा संघटनेचे प्रविण भोटकर,रक्षण भाऊ देशमुख,करण साहू,आशीष साबळे विजय मुर्तडकर,नितिन पाटील
सर्पमित्र बाळू काळणे उपास्थित होते.