किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातूर तालुक्यातील ग्राम पार्डी येथे दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी सुद्धा बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ पठनाचा कार्यक्रम घेण्यात आला होता. ग्रंथ समारोप आज दिनांक 9 ऑक्टोबर 2021 रोजी संपन्न झाला.व ग्रंथ पठण गावातील उपासक गुलाबराव दगडुजी हिवराळे ह्यांनी केले.कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सावित्रीबाई हिरासिंग राठोड उपाध्यक्ष जि. प. अकोला,सुनील फाटकर जि. प.सदस्य,सुनिता अर्जुन टप्पे पं.स.सदस्य तसेच भारतीय बौद्ध महासभा कडून अरुण चक्रणारायन, विद्याताई आकोडे,राजेश सरकटे, विलासराव गवई,दामोदर पोहरे,भीमराव वानखडे,भारत आकोडे उपसरपंच नितेश हिवराळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.व सायंकाळी सुप्रसिद्ध भिम गित गायक महेंद्र नृपणारायन ह्यांचा संच ह्यांनी भिम गीत गायन करून सामाजिक प्रबोधन केले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विशाखा महिला उपासक उपासीका संघ पार्डी सम्यक नवयुवक मंडळ पार्डी स्वाधीन बहुद्देशीय संस्था पार्डी ह्यांनी अथक परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी केला.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)