परिसरात भितीचे वातावरण.
वनविभागाने परिसरातील नागरिकांना दिला सर्तक राहण्याचा ईशारा.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली/पेरमिली-अहेरी तालुक्यातील आलापल्ली-भामरागड च्या मुख्य मार्गावर असलेले पेरमिली या ठिकाणी वाघ आढळल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.दि.25 आँक्टो रोजी सायं 5 वाजता गावातील पेरमिली येथील वनपरिक्षेञातील कर्मचारी क्वार्टर परिसरातील नर्सरी परिसरात वनविभागाच्या कामातील काही चौकीदारला वाघ काही बैलांच्या मागे धावत असल्याचे आढळल्याचे दिसले.माञ त्या वनविभागाच्या चौकीदारांनी हिम्मत दाखवित त्या बैलांची वाघापासुन आरडाआेरड करून सुटका केली.त्यामुळे त्या बैलांचे प्राण वाचले.काही दिवसापुर्वी पेरमिली वनपरिक्षेञ अंतर्गत येणारे कुरूमपल्ली-कोडेकसा जंगलात वाघाने एक वासरू व बकरिवर हल्ला करून ठार केले होते.तेव्हा पासुन या परिसरात भितीचे वातावरण पसरले होते.माञ आता गावातील वनविभागाच्या नर्सरी मध्ये प्रत्यक्षात वाघाचे दर्शन झाल्याने परिसरातील नागरिकामध्ये अधिकच भितीचे वातावरण पसरले आहे.वाघ आढळल्याची माहीती मिळताच वनविभागाचे कर्मचारी एम.के.तिम्मा प्रभारी वनपाल पेरमिली यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार घटनास्थळी जावुन मौका चौकशी केली.व परिसरातील नागरिकांना सर्तक राहण्याचा ईशारा दिला आहे.