महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.२७:-येथील नगरसेविका तथा भद्रावती नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा सरिता सूर यांची महिला काॅंग्रेसच्या शहर अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली.भद्रावती येथे आयोजित भद्रावती-वरोरा विधानसभा क्षेत्रातील सरपंचांचा सत्कार आणि कांग्रेस प्रवेश कार्यक्रमाप्रसंगी त्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, खा.बाळूभाऊ धानोरकर, आ.प्रतिभाताई धानोरकर, आ.सुभाष धोटे, काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.त्यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)