महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.२८:-अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे संघटन ९ जुलाई १९४९ पासुन विद्यार्थी विकासासाठी आणि समाज हितासाठी समाजात कार्यरत असून भद्रावती शहरात संघटनेच्या सदस्यता अभियानाला सुरुवात झाली आहे.या संघटनेचे २५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या काळात सदस्यता अभियान राबविण्यात येत आहे. या सदस्यता अभियाना अंतर्गत भद्रावती शाखेच्या कार्यकर्त्यांनी सदस्यता केली. या सदस्यता अभियानातून विद्यार्थ्यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या माध्यमातून समाजात काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.या अभियानातुन संधीचेच सोने करण्याची विद्यार्थ्यांना संधी आहे. या अभियानात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सदस्यता करावी असे आवाहन अभाविप भद्रावती तर्फे करण्यात आले आहे. या दरम्यान चंद्रपुर विस्तारक अमित पटले, चंद्रपुर जिल्हा सदस्यता प्रमुख जयेश प्रशांत भडगरे, जिल्हा समिती सदस्य शैलेश शंकर दिंडेवार व भद्रावती नगरातले कार्यकर्ते उपस्थित होते.