किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातूर येथील शिलाऀ ग्रामपंचायत अंतर्गत येणारा पातुर खानापूर रोड हा अतिशय खड्डेमय झाल्याने या रस्त्यावरून ये जा करणारे नागरिक, वाहनधारक तसेच विद्यार्थी यांना खुप त्रासदायक जीवघेणा रोड झाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून या रोडची दुरवस्था झाली असून काही अपघात सुद्धा झाले आहेत गेल्या काही दिवसांत दोन तीन वेळा या रोडवर मुरूम टाकून खड्डे भरून काढण्यात आले होते परंतु पावसाळा सुरू असल्याने व रोडवरील रहदारीमुळे पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे.
पातुर तालुका विकास मंचाने शहरातील सामाजीक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व संघटना आणी सर्वपक्षीय कार्यकर्ते यांना आवाहन केले असता संघटनांच्या व विविध पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या ऐवजी शेकडो सर्वसामान्य नागरिकांनी स्वत:हून सकारात्मकता दर्शवत या श्रमदानात हिरीरीने सहभाग नोंदवून भारताचे दिवंगत राष्ट्रपती तसेच भारतरत्न डॉ राधाकृष्णन सर्वपल्ली यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिनाचे औचित्य साधत या रोडवरील खड्डे मुरूम टाकून बुजवले.श्रमदानास उपस्थित निवृत्त शिक्षक दगडू लोथे,जि.प.शिक्षक योगेश पैठणकर,सतिश कवले,राठोड सर शाहबाबू हायस्कूल चे लोकमत समाचारचे साजिद सर यांना पातुर तालुका विकास मंचच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
श्रमदानातून असा ही एक आगळा वेगळा शिक्षक दिन साजरा झाल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पातुर तालुका विकास मंचाने व शिक्षकांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून हातात फावडा व डोक्यावर टोपले घेत श्रमदान करत जे काम लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे आहे ते काम
श्रमदान करण्यासाठी पातुर तालुका विकास मंचाने दोन दिवस अगोदर सोशल मीडिया वर जाहीर आव्हान केले होते त्याला काही संघटनांनी जाहीर पाठिंबा दर्शविला होता त्यामध्ये श्रीराम सेना,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पातुर तालुका आणी पातुर तालुका प्रहार संघटना यांचा समावेश होता.
श्रमदान करते वेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पातुर तालुका अध्यक्ष देवानंद गहिले,शिक्षक तसेच लोकमत समाचारचे प्रतिनिधी साजिद सर,श्रीराम सेना विदर्भ अध्यक्ष पै.मंगेश गाडगे,प्रहार संघटनेचे अमोल करवटे,निवृत्त शिक्षक दगडू लोथे,योगेश पैठणकर,सतिश कवले,राठोड सर आणी पातुर तालुका विकास मंचाचे पदाधिकारी किरणकुमार निमकंडे,गणेश गाडगे,योगेश फुलारी,डॉ.विलास हिरळकार,मधुकर राखोंडे,डिगांबर फुलारी,रंजीत गाडेकर,अजित अल्हाट,नितीन वानखडे,स्वप्निल गणेशे,रूपेश फलके,विठ्ठल डिके,विष्णू बंड,बाळू देवकर,बाळू उगले,सैय्यद खालेद,लुकमान चिखलीकर,शाहरुख शेख, विकलांग सोनू समवेत ज्यांनी या श्रमदानात मोफत जेसीबी मशीन दिली असे प्रसिद्ध उद्योजक प्रशांत म्हैसने यांच्या सह अनेक नागरिक उपस्थीत होते.