सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
मेहकर : महाराष्ट्र शासनाच्या शेतकऱ्यांना सक्षम करणाऱ्या ई- पीक पाहणी प्रकल्पाची सुरुवात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी 13 ऑगस्ट पासून करण्यात आली त्याअनुषंगाने “ माझी शेती माझा सात बारा, मीच नोंदवणार माझा पीक पेरा ” या मोहिमे अंतर्गत जिल्हाधिकारी बुलडाणा व उपविभागीय अधिकारी मेहकर विद्यमान तहसीलदार यांच्या मार्गदर्शनात मेहकर तालुक्यातील ई-पीक पाहणीची सुरुवात झाली आहे.त्या अनुषंगाने आज 26ऑगस्ट रोजी देऊळगाव माळी येथे ग्रामपंचायत कार्यालयात महसूल विभागाकडून आपण डिजिटल माध्यमातून आपला सातबारा वर आपला पिक पेरा कसा नोंदवावा याची इत्थंभूत माहिती महसूल विभागा मार्फत राम नवघरे यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना डिजिटल माध्यमातून व्यवस्थित समजावून सांगितले. यावेळी शेतकऱ्यांना त्यांच्याच मोबाईलवरुन पीक पेऱ्याची माहिती, जलसिंचनाच्या साधनाची माहिती ऑनलाईन ॲपवर कशी भरायची व पिकाचे फोटो कशे अपलोड करावयाचे याबाबतचे मार्गदर्शन केले .
ई- पीक पाहणी प्रकल्प हा शासनाचा महत्वकांक्षी प्रकल्प असुन यामध्ये शेतकरी त्यांच्या मोबाईल ॲपमधुन आपल्या पीक पेऱ्याची माहिती जलसिंचनाची साधने, पीकाची परिस्थीती,बांधावरील झाडे इत्यादी नोंदी स्वत: घेउन त्यांचे छायाचित्र अपलोड करु शकतात व संबधित तलाठी यांचे लॉगीन वरुन त्याला मान्यता मिळाल्या नंतर सदर माहिती वेबसाईटवर अदयावत करण्यात येते. सदर ॲप हा हाताळण्यासाठी अत्यंत सोपा असुन ॲड्राईड फोनवरुन मराठी भाषेमधुन माहिती भरता येते व एका मोबाईल क्रमांकावरुन 10 शेतकऱ्यांची माहिती अदयावत करता येते. सदर ॲप हा गुगल प्ले स्टोअर वर “ ई- पीक पाहणी “ या नावाने सर्वांसाठी निशुल्क उपलब्ध असुन देऊळगाव माळी साजातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पीक पेऱ्याची माहिती अदयावत करावी असे आवाहन तलाठी विनोद पऱ्हाड यांनी केले. सरपंच किशोर गाभणे, उपसरपंच रंगनाथ चाळगे, माजी सरपंच अशोक गाभणे, डॉ.गीऱ्हे, बी.के.सुरूशे, बबन कापरे,केशव मगर, शिवशंकर मगर इ गावातील नागरिक उपस्थित होते.


