योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर
चंद्रपूर – चिमूर तालुक्यातील शंकरपूर जवळ असलेला शिवरा येथील ग्राम पंचायत मध्ये आज 75 व्या स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सवी वर्षाचे निमित्ताने ग्राम पंचायत शिवरा येथील सरपंच यांनी ध्वजारोहण सोहळाचा मान शिवरा येथील माजी सैनिक देविदास खडसंग यांना दिला. ज्यांनी देशासाठी अहोरात्र सेवा देणारे भारतीय सैनिकांच्या हस्ते शिवरा ग्राम पंचायत चा ध्वजारोहण करण्यात आला. शिवरा येथील ग्राम पंचायत सदस्य यांच्या हस्ते ग्राम पंचायत आवारात वृक्षारोपण करून आज देशाला “वृक्षवल्ली आम्हा सोयरे” असा संदेश देत ग्राम पंचायत कार्यालयासमोर सुध्दा कुंडीमध्ये शोभिवंत झाडे लावण्यात आली. 15 ऑगस्ट चा औचित्य साधून सरपंच अतुल नंनावरे यांनी आज उपस्थित गावकऱ्यांसमोर तंबाखू मुक्तची शपथ घेतली. त्याप्रसंगी अतुल नंनावरे सरपंच, सुनिल घुटके उपसरपंच, सेविदास सावसाकडे ग्रा.प. सदस्य, एम.व्हि. गोवर्धन सचिव, किशोर भरडे ग्रा.प.कर्मचारी, योगेश्वर शेंडे ग्रा.प.ऑपरेटर, सर्व ग्रा.प. सदस्य शाळेतील शिक्षक गावातील नागरिक उपस्थित होते