गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा:-महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे आढावा बैठक आज ०८ ऑगस्ट शनिवार रोजी तेल्हारा शहरातील विश्रामगृह येथे संपन्न झाली यावेळी महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे तेल्हारा तालुका अध्यक्ष विलास बेलाडकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी आढावा बैठकीत तेल्हारा तालुक्यातील पदाधिकारी यांच्या नियुक्त्या व शहरातील नियुक्ती आणी आरोग्य शिबिर घेण्याबाबत तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी गणेशराव उमाळे चिटणीसपदी, सुनील गवई तालुका उपाध्यक्ष पदी, संदीप सोळंके शहराध्यक्षपदी, अनिल भाकरे तालुका कोषाध्यक्षपदी, गोकुळ हिंगणकर तालुका प्रसिद्धीप्रमुख, शुभम सोनटक्के शहर प्रसिद्धीप्रमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिल भाकरे यांनी केले तर आभार संगपाल गवारगुरू यांनी मानले यावेळी गणेशराव उमाळे,गुरुदेव ईसमोरे, गोवर्धन गावंडे, केशवराव कोरडे, ज्ञानेश्वर बहाकर ,दीपक दारोकार, संदीप सोळंके, शुभम सोनटक्के, गोकुळ हिंगणकर ,धम्मदीप बोदडे, , अनिल भाकरे ,सुनील कुमार धुरडे, रविंद्र ढाकरे, गोपाल विरघट,विनोद सगणे, महेंद्र तायडे, श्रीकृष्ण वायकर, संघपाल गवारगुरु ,रक्षीत बोदडे, सुनिल गवई,आदी पत्रकार उपस्थित होते