रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा यांचं आयोजन वसंत देसाई स्टेडियम अकोला येथे करण्यात आले होते इथे संपूर्ण सात तालुक्या तील वयोगट 14 वर्षां मधील मुली खेळण्यासाठी आलेल्या होत्या. यामध्ये हिवरखेड सेंट पॉल अकॅडमी च्या विद्यार्थ्यांनी सेंट पॉल पब्लिक स्कूल अकोट यांचा पराभव करत विभाग स्तरावर आपले नाव नोंदवले यामध्ये स्वरमई आमले, प्रीयल खारोडे, भक्ती लखोटिया, रमणी हlगे,किमया हनुवंते या विद्यार्थ्यांनी विजय प्राप्त करत शाळेचे नाव विभाग स्तरावर नेले आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय क्रीडा शिक्षक जगदीश वडाळकर सर यांना दिलेले असून संस्थेचे अध्यक्ष नवनीत लखोटिया, संस्थेचे सचिव प्रमोदजी चांडक संस्थेचे उपाध्यक्ष लुंकरण डागा सर व शाळेच प्राचार्य चंद्रकांत तिवारी सर आणि शाळेच्या उपमुख्या ध्यापिका गांधी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.










