अमरावती : महाडीबीटी प्रणालीवरील सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जाती प्रवर्गाचे महा ॲडमिनकडून ऑटो रिजेक्ट झालेले भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचे ऑनलाईन अर्ज पुनश्च महाविद्यालयाच्या प्रिन्सिपल लॉगइनमध्ये परत आले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी पात्र अर्जावर तात्काळ कार्यवाही करुन जिल्हा लॉगइनला परत पाठविण्यात यावे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ‘भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती’ ही योजना राबविण्यात येते. विहित मुदतीत अर्ज जिल्हा लॉगइन ला पाठविण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची राहील. तसेच पात्र मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त, माया केदार यांनी केले आहे.










