चंद्रकांत श्रीकोंडवार
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा : गुंजेपार ते खोकरला या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सबंधित यंत्रणेने ज्या ए जन्सिला नवीन पुल तयार करण्याचे कंत्राट दिले. त्या एजन्सिने पुलाचे बांधकाम केले परंतु पुलासमोरिल रस्त्याचे खडीकर नासह डांबरीकरण केले नाही त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजू जवळील रस्ता मातीमोल झाला असून या रस्त्यावरून पादचारी,सायकल स्वार, तसेच दुचाकी व चारचाकी वाहन धारकांना प्रवास करणे जिकीरीचे झाले असून एखादा अपघात होऊन जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे जिल्हा व तालुका प्रशासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सबंधित यंत्रणेने सदर नव निर्माण पुलाजवळील रस्त्याची प्रत्यक्ष मोका पाहणी करून या रस्त्याचे खडी करणास ह डांबरीकरण करण्याची तसदी घ्यावी मात्र याकडे हेतू पूर स्पर अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले तर भंडारा ते खात रामटेक कडे जाणाऱ्या मार्गावर खुर्शि पार या येथे केव्हाही रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल व या बाबतची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची राहील असा इशारा ज्येष्ठ नागरिक संघटनेचे नेते मं सा राम बुर डे,शामराव मोह तुरे, विलास चव्हाण यांनी दिला आहे.गुंजेपार गाव परिसरातील नागरिक ,विद्यार्थी ,सर्व सामान्य जनता या मार्गावरून भंडारा येथे दररोज आवागमन करतात परंतु सदर मार्गावर जो नवीन पुल तयार करण्यात आला त्या पूला शेजारील दोन्ही बाजू कडील रस्ता पुलाच्या बांधकामामुळे उध्वस्त झाला असल्याने याठिकाणी दुचाकी,चारचाकी वाहन फसतात त्यामुळे सर्व प्रकारच्या प्रवाश्यांना प्रवास करतांना त्रासदायक ठरत आहे. यापूर्वी देखील सदर रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती तरीपण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सबंधित यंत्रणेने या रस्त्याच्या समस्येकडे हेतू पूर स्पर अक्षम्य दुर्लक्ष केल्याने ही समस्या पुन्हा उद्दभवली असल्याने या ठिकाणाहून मार्गक्रमण करताना तारांबळ उडत असल्याची दस्तुरखुद्द प्रवाशी नागरिकांची मोठी ओरड आहे. मागणी करूनही सदर पुलाजवळील रस्ता दुरुस्त करण्यात येत नाही त्यामुळे प्रवाशी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व असंतोष पसरला असून भविष्यात या असंतोषाचा तीव्र भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत जिल्हा व तालुका प्रशासनाच्या संबंधित यंत्रणेने वेळीच दखल घेऊन एक विशेष बाब म्हणून गुंजेपार ते खो करला या रस्त्यावरील नवीन पुलाच्या जवळील नादुरुस्त रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा ,मात्र याकडे हेतू पूर स्पर दुर्लक्ष करण्यात आले तर या विरोधात केव्हाही रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल व या बाबतची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची राहील असा इशारा ज्येष्ठ नागरिक संघटनेचे नेते मंसाराम बुरडे,शामराव मोह तुरे,विलास चव्हाण यांनी दिला आहे.