डॅा.एच.एन.सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालयाचा मोठा सहभाग..
अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातूर दि.18 जुलै 22 आजादी का अमृत महोत्सवा निमित्त राष्ट्रीय महामार्ग व सडक निर्माण विभागाच्या माध्यमातून वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.ह्या कार्यक्रमच्या अतिथी अकोल्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती निमा अरोरा मॅडम तसेच डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास भाले व इतर मान्यवारांच्या उपस्थिती मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.ह्या कार्यक्रमासाठी डॅा.एच.एन.सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा.किरण खंडारे,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.राहुल माहुरे व रासेयो चे ३५ विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदवुन वृक्षारोपण केले.आज पृथ्वीवरील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावणे आवश्यक आहे.झाडे लावा झाडे जगवा तेव्हाचं मनुष्य जीवंत राहु शकतो ही भावना मनात ठेवुन या उदात्त हेतुने विद्यार्थी या अभियानात सहभागी झाले होते असे मत प्राचार्य डॅा किरण खंडारे यांनी यावेळी व्यक्त केले.











