विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला
अकोला : बरेच दिवसापासून पासून पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी पोलीस स्टेशन अंतर्गत पोलिसांनी गुन्हेगारीला आळा घालण्याचे काम केली असता. त्यातच बोरगाव मंजू येथील काही गुटका माफिया मोटर सायकल ने गुटखा विक्री करण्या चा सुगावा पिंजर पोलिस स्टेशनचे ठाणेदार अजय कुमार वाढवे यांना लागला तेच त्यांनी पोलीस स्टेशन चे कर्मचारी घेऊन टाकळी पोटे येथे मो. अन्सार मो युसुफ, अंदाजे वय ३९. शे अलीम शे रहीम वय २५ राहणार बोरगाव मंजू टाकळी पोटे येथून तंबाखू युक्त गुटका पुडी विक्रीकरिता जात असताना पोलिसांनी त्यांना पकडले असता मोटरसायकल सह ६९,०४० रूपाचा माल जप्त केला आहे. ही कारवाई पिंजर पोलिस स्टेशनचे ठाणेदार अजयकुमार वाढवे, पी एस ओ मेश्राम, पो. हेड कॉ. राजू वानखडे, सतीश कथे, रोशन पवार , यांनी केले आहे.