अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
अकोला : स्थानिक सार्थक वक्तृत्व अकॅडमी द्वारा आयोजीत बक्षीस वितरण समारंभात प्रमुख मार्गदर्शक म्हणुन प्रा राहुल माहुरे यांनी वरील प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा प्रभाकरराव कवाडे होते. तर प्रमुख पाहुणे म्हनुन प्रा ॲड आकाश हराळ विचारपीठावर उपस्थीत होते. १५ दिवसीय कार्यशाळेमध्ये २५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी विविध स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवराज अडगांवकर यांनी केले.पुढे बोलतांना प्रा राहुल माहुरे म्हणाले की,स्पर्धेच्या युगात व्यक्तिमत्त्व विकासाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवाय दैनंदिन व्यवहारांमध्ये स्वतःला इतरांच्या तुलनेत सरस ठेवण्यासाठी व्यक्तिमत्त्व विकासाची निकड जाणवू लागली आहे. अशा वेळी काय करावे, आणि काय करु नये अशा मानसिक तणावातून आजचा तरुण वर्ग जात आहे.यासाठी स्वतःला समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या वागण्या- बोलण्यातून सकारात्मक भाव समोरच्या व्यक्तीवर प्रतित व्हायला हवा. कोणताही प्रसंग असो तुम्हाला मत असणे अत्यंत आवश्यक आहे. मत नसलेल्या व्यक्तिला सध्याच्या स्पर्धात्मक युगात स्थान नाही. यासाठी भरपुर वाचन करा ज्ञान वाढवा कारण वाचणामुळे आपण चिंतण करतो आणि त्यातुन चं आपल्याला दिशा मिळते असे प्रतिपादन केले.
प्रमुख पाहुणे म्हनुन प्रा ॲड आकाश हराळ यांनी विद्यार्थ्यांना विविध उदाहरणाद्वारे भाषेचे महत्व सांगीतले. कार्यक्रमाचे संचालन लता लोणारे यांनी तर आभार प्रदर्शन सम्यक वानखडे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी विशाल नंदागवळी, वैष्णवी हागोणे, आदित्य बावनगडे, तुषार नंदागवळी यांनी अथक परिश्रम घेतले.











