गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले मनसुवर्ण प्रतिष्ठान द्वारा छत्रपती शिवाजी महाराज जयंती व संत नरहरी महाराज पुण्यतिथी निमित्त ई- श्रम कार्ड व मतदार नोंदणी अभियानचे दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते ४ पर्यंत मोठा महादेव संस्थान, हिवरखेड येथे आयोजन करण्यात आले आहे.ई-श्रम कार्ड हे भविष्यात येणाऱ्या सरकारमान्य योजना चा लाभ घेण्याकरिता उपयोगात येणार आहे,कमी दरात म्हणजे प्रतिष्ठानच्या माध्यमाने उपलब्ध (फक्त ५० रू शुल्क ई श्रम कार्ड फक्त ३० रू मध्ये) तसेच नवयुवक युवतींनी आपला मतदान नोंदणी करून घ्यावी,सर्व गावकरी मंडळीनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन मनसुवर्ण प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले.











