अमरावती दि. 9 : राज्यात कोविड-19 रोगाचा संसर्ग रोखण्याचे अनुषंगाने सिपना वन्यजीव विभागा अंतर्गत पर्यटनासाठी दि. 11 जानेवारी 2022 पासून पुर्णत: बंद ठेवण्यात आले होते.
महाराष्ट शासन महसूल व वनविभाग, आपत्ती व्यवस्थापण मदत व पुनर्वसन मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार पर्यटनासाठी दि. 2 फेब्रुवारी 2022 पासून सुरु करण्यात येत आहे. पर्यटकांनी प्रवेशाच्या वेळी त्यांच्या लसीकरणाच्या दोन्ही मात्रा झाल्याचे प्रमाणपत्र दाखविणे बंधनकारक राहील, यांची सर्व पर्यटकांनी नोंद घ्यावी.