प्रेमी युगुलांसाठी फेब्रुवारी महिना तसा खासच म्हणावा लागेल. कित्येक जण या महिन्याची चातकासारखी वाट पाहत असतात. तसा फेब्रुवारीचा महिना हा प्रेमी युगुलांसाठी तसा खासच असतो म्हणा. या महिन्याला प्रेमी युगुल प्रेम मासिक असे देखील संबोधतात. कारण याच महिन्यात कुणाचे प्रेमप्रकरण जुडते तर कुणाचे कायमचेच टुटते.
फेब्रुवारीच्या सात तारखेपासून, प्रेमाच्या खऱ्या परिक्षेला सुरुवात होत असते. प्रेमी युगुलासाठी एक आठवडा या परिक्षेचे आयोजन जगभरात करण्यात येते. मात्र त्यासाठी प्रेमाच्या परिक्षेत पास होणे अत्यंत आवश्यक असते. कारण एकदाकी प्रेमाच्या परिक्षेत पास झालात की मग बससस… या परिक्षेत काही नवीन खिलाडी असतात, तर काही जुने. नवीन खिलाडी ही परिक्षा देऊन नवीन नाते जोडण्याचे प्रयत्न करत असतात.
तर जुने खिलाडी दरवर्षी परिक्षेत बसुन, जास्तीत जास्त अंक मिळवण्याचे प्रयत्न करतात. जर तुम्हाला देखील ही परिक्षा द्यायची आहे. तर या परिक्षेचे वेळापत्रक आता जाहीर झाले आहे. कोणता पेपर कधी आहे, जेणेकरुन या परिक्षेची तयारी व्यवस्थितरित्या होऊ शकेल. चला तर मग जाणून घेऊया प्रेमाच्या परिक्षेचा हा वेळापत्रक ज्यात अनेक जण देणार आहेत जगातील सर्वात अवघड परिक्षा… जाणून घेऊया….
पहिला दिवस रोझ डे (7 फेब्रुवारी)
प्रेमाच्या या परिक्षेचे नाव आहे व्हॅलेंटाईन डे. याची सुरुवात 7 फेब्रुवारीपासून होत असते. सर्वात आधी पहिला दिवस असतो, तो रोज डे. म्हणजे प्रेमाच्या या अनोख्या आठवड्याची सुरुवात गुलाबाच्या सुंदर सुगंधाने आणि त्यांच्या सौंदर्याने होते. या दिवशी प्रेमी जोडपे एकमेकांना गुलाबाचे फुल देऊन, मनातल्या भावना एकमेकांना व्यक्त करतात. गुलाबचे वेगवेगळे असणारे रंग आपल्या भावना दर्शवतात. जसे की, अनेक जण रोझ डेच्या दिवशी आपल्या मित्राला, क्रश आणि शत्रूंना वेगवेगळ्या रंगाचे गुलाब देत असतात. कारण गुलाबाच्या रंगाच्या वेगवेगळे अर्थ देखील आहेत.
दुसरा दिवस प्रपोझ डे (8 फेब्रुवारी)
व्हॅलेंटाईन डे चा दुसरा दिवस असतो तो म्हणजे प्रपोझ डे. या दिवशी आशिक आपल्या मनातील भावना समोरच्या व्यक्तीला सांगतो. म्हणजेच जी कुणी समोरची व्यक्ती त्याला आवडत असते, तो त्याला आपल्या मनातील भावना प्रपोझच्या माध्यमातून सांगत असतो. तर तुम्ही पुर्वीपासूनच रिलेशनशिपमध्ये असाल, तर तुम्ही या दिवशी आपल्या पार्टनरला अनोख्या स्टाईलने प्रपोझ करुन आपल्या नात्यात आणखीणच गोडवा निर्माण करू शकता.
तिसरा दिवस चॉकलेट डे (9 फेब्रुवारी)
कोणत्याही नात्यात प्रेम असले तर मग गोडवा आपोआपच निर्माण होतो. त्यामुळे व्हॅलेंटाईन डेच्या आठवड्यात आपण गोडव्याद्वारे नात्यामध्ये आणखीणच गोडवा निर्माण करू शकता. तिसरा दिवस हा चॉकलेट डे असतो. त्यात जोडपे एकमेकांना चॉकलेट देऊन नात्यात गोडवा आणण्यासाठीचे प्रयत्न करत असतात.
चौथा दिवस टेडी डे (10 फेब्रुवारी)
आपले हृदय हे टेडीसारखे नाजूक आहे, त्यामुळेच तर म्हटले जाते दिल तो बच्चा है जी. त्यामुळे व्हॅलेंटाईन डे चा एक दिवस टेडी दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी कपल एकमेकांना टेडी बियर गिफ्ट करतात. मुलींना अशा प्रकारचे गिफ्ट खुपच जास्त आवडतात, त्यामुळे मुले मुलींना या दिवशी डेटी मोठ्या प्रमाणात देतात.
पाचवा दिवस प्रॉमिस डे (11 फेब्रुवारी)
जेव्हा तुम्ही एखाद्या सोबत रिलेशनशिप असतात किंवा कुणासोबत नवीन नाते जोडवण्याचे प्रयत्न करतात. तेव्हा तुम्हाला समोरच्या व्यक्तीला काहीतरी वचन द्यावे लागते. तसे पाहिल्या गेले तर पार्टनर एकमेकांना कधी आणि केव्हाही वचन देऊ शकतात. मात्र व्हॅलेंटाईन डे च्या पाचव्या दिवशी जोडप्यांसाठी खास प्रॉमिस डे असतो. यादिवशी तुम्ही आपल्या पार्टनरला नेहमी सोबत राहण्याचे, नेहमी आनंदी राखण्याचे किंवा अन्य काही वचन देऊ शकतात.
सहावा दिवस हग डे (12 फेब्रुवारी)
व्हॅलेंटाईन डे च्या सहावी दिवशी हग डे असतो. या दिवशी प्रेमी युगुल एकमेकांची गळाभेट घेतात. जादूची झप्पीच्या बहाण्याने जोडपे एकमेकांना आपल्या हृदयातील भावना एकमेकांना सांगतात.
सातवा दिवस किस डे (13 फेब्रुवारी)
शब्दांनी प्रेम व्यक्त करता येत नसले तरी, एका प्रेमळ चुंबनाने प्रियकर खूप काही सांगून टाकतो. व्हॅलेंटाईन डे च्या सातव्या दिवशी किस डे असतो. यादिवशी जोडपे एकमेकांची प्रेमळ चुंबन होतात.
या सात दिवसात परिक्षेत मेहनत घेऊन पास झालेले प्रेमीयुगुलचा निकाल 14 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येतो. आपण या प्रेमाच्या परिक्षेत पास झाल्याचा आनंद पार्टनर एकमेकांना शेअर करत व्हॅलेंटाईन डे साजरा करत असतात. मात्र जो या परिक्षेत नापास झाला, त्याच्यासाठी हा दिवस जरा कठीण म्हणावा लागेल. कारण आपल्या समोर परिक्षेत पास होऊन व्यक्ती जर आनंद साजरा करत असेल, तर दुख: जरा जास्तीत होतो. ते म्हणतात ना, दोस्त फेल होता है तो दुख: होता है और पास होता है तो और जादा दुख: होता है…