महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रवती : हिंदुरुदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 23/01/2022 ला नंदू पढाल शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक यांच्या मार्गदर्शनात शिवसेना कार्यालयात मुकेश जीवतोडे जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांच्या नेतृत्वात मा. बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली, तसेच क्षितिज कामतकर या चित्रकाराने फक्त पेन्सिलच्या साहाय्याने बाळासाहेबांची प्रतिमा बनवून ती शिवसेना जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली. त्याप्रसंगी या चित्रकाराचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाळासाहेबांच्या जीवनावर मार्गदर्शन केले,तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वारासमोर भोजनदान कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी रमेश मेश्राम शिवसेना उपजिल्हाप्रमुख, हर्षद शिंदे युवा सेना जिल्हाप्रमुख, बाळा शिरसागर उपतालुकाप्रमुख, घनश्याम आसवले युवासेना समन्वयक, राजू सारंगधर नगरसेवक माया नारडे महिला सेना उपजिल्हाप्रमुख, कीर्ती पांडे महिला सेना उपजिल्हा










