महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : नेहरू युवा केंद्र चंद्रपूर व शौर्य क्रिडा मंडळ चंदनखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत चरुर(धा) येथे ९० दिवसीय शिलाई तसेच कटाई प्रशिक्षण नुकतेच सुरु करण्यात आले.प्रशिक्षणाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच भारती उरकांडे होत्या. प्रशिक्षणाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल हनवते यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ग्राम पंचायत सदस्य बंडू निखाते,प्रतिभा दोहतरे,आशा नन्नावरे,महाले, अमोल दडमल,शिलाई मशीन शिक्षिका लता नन्नावरे व गावातील प्रशिक्षणार्थी महिला वर्ग उपस्थित होते. मागदर्शन करताना विठ्ठलजी हनवते म्हणाले की, स्पर्धेच्या युगात स्वयंरोजगाराची फार मोठी गरज आहे.त्यामुळे तरुणींनी गृहउद्योगाकडे वळावे. ग्रामपंचायत सदस्य बंडू निखाते म्हणाले की, ग्रामीण भागातील महिलांनी स्वयंस्फूर्त तसेच महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून ग्रामीण महिलांकरिता मोफत शिवनकला प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. प्रास्ताविक नेहरू युवा केंद्र केंद्राचे माजी राष्ट्रीय युवा स्वयंसेवक तथा शौर्य क्रिडा मंडळ चंदनखेडा चे अध्यक्ष आशिष सुरेश हनवते यांनी केले. संचालन नंदकिशोर जांभुळे यांनी केले.तर आभार नेहरू युवा केंद्राचे माजी राष्ट्रीय युवा स्वयंसेवक तथा विरांगणा मुक्ताई क्रिडा मंडळ चरुर चे अध्यक्ष महेश केदार यांनी मानले.