सुरेशकुमार पंधरे उपजिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा (१७जुन) जिल्ह्यातील सर्व तालूक्यात कोविड लसीकरणात ज्या गावांचा प्रतिसाद कमी किंवा अत्यल्प आहे.अशी गावातील ४५ वर्षावरिल सर्व नागरिकासाठी येत्या सोमवारी व मंगळवारी दि २१ व २२ जून रोजी जिल्ह्यात लसीकरणाची विशेष मोहीम आयोजित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी सर्व यंञणांना दिले.नागरिकांनी लस घ्द्यावी यासाठी शुक्रवार ते रविवार दरम्यान सर्व अधिकाऱ्यां- नी विशेष जनजागृती अभियान राबविण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. आज जिल्हाधिकारी कार्यालयात दुरदॄश्य प्रणालीच्या माध्यरातून कोविड19 व लसी- करण अभियानाचा आढावा घेतला असता त्यांनी उपरोक्त निर्देश दिले उपजिल्हाधिकारी महेश पाटील जिल्हा आरोग्य अधिकाऱी डाँ.प्रशांत उईके,जिल्हा आपत्ती व्यवस्थापण अधिकारी अभिषेक नामदास डाँ माधुरी माथुरकर यावेळी उपस्थीत होते यावेळी उपविभागीय अधिकारी,
तहसीलदार,खंड विकास अधिकारी,हे दुरदॄश्य प्रणालीव्दारे उपस्थीत होते.लसीकरण कमी असलेले तालुकानिहाय गावांची संख्या खालीलप्रमाने आहे.भंडारा 53मोहाडी-26,साकोली-48,लाखनी 25,पवनी-39,लांखादुर-34, व तुमसर-19,अशा एकुन 244 गावामध्ये दोन दिवस लसीकरण मोहीम राबवण्यात येणार,आहे,
सोमवारी 130 गावात तर मंगळवारी 114 गावामध्ये ४५ वर्षावरील सर्व वयोगटातील सर्वांना लस देण्याचा उपक्रम आहे.कोरोणावर लस हाच एकमेव उपाय असून नागरिकांनी लस टोचून घ्यावी.यासाठी तालुकास्तरीय सर्व विभागाचे अधिकाऱी ,शिक्षक,ग्रामसेवक,
तलाठी ,अंगणवाडी सेविका
आशा स्वंय सेविका यांनी घरोघरी भेटी देऊन लस घेण्या- साठी प्रोत्साह़ित करावे याकरिता सरपंच ,पोलीस पाटील स्थानिक लोकप्रतिनिधीचे सहकार्य घेण्यात यावे. गॄहभेटीत आरोग्यासाठी लसीघे महत्व सांगावे.असे सांगितले. ज्या गावात टक्केवारी कमी आहे तिथ वाढविण्यावर लक्ष केंद्रीत करून भर द्यावा . सर्व विभागांनी आरोग्य विभागास सहकार्य करावे. ज्या ठीकाणी प्रतिबंधीत क्षेञ आहे तिथे भेटी द्यावे. सोमवारी मंगळवारी उप- विभागीय अधिकारी तहसीलदार यांनी सर्वोतोपरि भेटी द्यावे व सहकार्य करण्याचे सुचणा जिल्हा धिकारी कदम साहेब यांनी दिले.व या बैठकीत कोरोणा विषयक आढावा घेण्यात आला .