पठाण जैद
तालुका प्रतिनिधि औसा
औसा लातुर : औसा तालुक्यातील हासेगाव येथील श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातुर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव येथील राष्ट्रिय सेवा योजने मार्फत महाविद्यालयात सर्व विद्यार्थी तसेच प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे कोविड19 व्ह्यक्सिनेशन (लसिकरण) हासेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे करुण घेण्यात आले . महाविद्यालयामध्ये 100 टक्के लसिकरण झाले असून सर्व विद्यार्थी आणि शिक्षक , कर्मचारी , व संचालक या सर्वानी लासिकरणाचा लाभ घेतला . यावेळी महाविद्यालयातिल 200 विद्यार्थ्याचे लसिकरण करुण घेण्यात आले . या मोहिमेस महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ श्यामलीला बावगे महाविद्यालयाचे राष्ट्रिय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा . बनसोडे गणेश प्रा . शेख सोहेल , प्रा सोमठाणे पल्लवी व राष्ट्रिय योजनेचे विद्यार्थी कु . चाफळे पृथ्वीराज , कु . हाके आश्विनी , कु , कांबळे अनुष्का , तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षक कर्मचारी इत्यादि उपस्थित होते . या कार्यबद्दल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे , सचिव वेताळेश्वर बावगे , कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे , यांनी महाविद्यालयाचे कौतुक केले .