जुबेर शेख
जिल्हा प्रतिनिधी लातुर
लातुर/लातूर शहरातील आर्वीरोड भागातील इयत्ता 10 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीस अज्ञात चौघांनी कारमध्ये घालून अपहरण केल्याची घटना घडलीया प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत अधिक माहिती अशी की, मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांची मुलगी इयत्ता 10मध्ये शिकत आहे. 30 तारखेस रात्री 9 वाजण्याच्या सुमारास त्या घरात स्वयंपाक करत असताना त्यांच्या मोबाईवर एकाचा फोन आला.सदरील फोन मुलीने उचलला आणि लगेच ती घरातून बाहेर गेली. थोडयाच वेळात त्यांच्या मावस भावाचा मुलगा धावत घराकडे आला आणि त्याने सांगितले की दीदीला चौघांनी कारमध्ये घालून साईडरोडकडे पळून गेले. सर्वत्र शोध घेऊन ही मुलगी सापडली नाही. ज्या मोबाईलवरून फोन आला तो नंबरही बंद येत आहे. एमआयडीसी पोलीसांनी अज्ञात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.










