रवि राठोड
ग्रामीण प्रतिनिधी वाकान.
महागांव : तालुक्यातील इजनी ते हिवरा (सं) येथील मुख्यमंत्री सडक योजनेचे काम अतीशय संत गतीने सुरू असल्याने येत्या शुक्रवारी दिनांक २१/०३/२०२५ रोजी येथील नागरिकांनी हिवरा येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा लेखी निवेदनातुन दिला आहे.मौजा इजनी येथे मुख्यमंत्री सडक योजनेचे काम मंजूर होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे.व सदर काम हे गजानन कंट्रकशन यांनी हाती घेतले आहे.मात्र संबंधित कंत्राटदार या कामाकडे सततच दुर्लक्ष व हलगर्जीपणा करीत आहे.सबंधीत कामाच्या भुमीपुजनापासुन येथील नागरिकांनी तीन आंदोलने केली.परंतु कुंभकर्णाच्या निद्रेत असलेल्या ठेकेदारावर कोणताही परिणाम झालेला नाही.सदर रस्त्याची अतीशय दुर्दशा झाली असुन या रस्त्याची चाळणी झाली आहे रस्त्यावरील गीटी उघडी पडली असुन येथील नागरिकांना व शाळकरी मुलांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.करीता पावसाळा सुरू होण्यापूर्वी येथील रस्त्याचे व पुलाचे बांधकाम तत्काळ करण्यात यावे अशा आशयेचे लेखी निवेदन येथील नागरिकांनी प्रशासनाकडे दाखल केले आहे.सदर रस्त्याच्या रखडलेल्या कामाला तात्काळ सुरूवात न केल्यास पुन्हा हिवरा येथे रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.


