सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
मेहकर तालुक्यामधील ग्रामीण भागात साब्रा या गावी आर्थिक दुर्बल घटकातील सर्व जातीधर्मातील विद्यार्थ्यांना शालेय व वारकरी संप्रदायाचे शिक्षण मोफत देण्यासाठी साबरा येथे मैत्री दिनाचे औचित्य साधून १ ऑगस्ट रोजी वारकरी संप्रदायाच्या प्रमुख उपस्थिती मध्ये अनाथालया चे केले उद्घाटन मेहकर तालुका विकास कामापासून वंचित असल्यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील जनतेची संख्या मोठ्या प्रमाणात आहे तसेच गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोणा महामारीमुळे आई-वडिलांच्या छत्रछायेपासून अनाथ झालेले शालेय शिक्षणापासून आर्थिक दुर्बल घटकातील मुले पैशाअभावी वारकरी व शालेय शिक्षण घेण्यासाठी जाऊ शकत नसल्यामुळे त्यांच्यासाठी साबरा येथे सांगितला अनाथ आश्रम उघडण्याच्या माणूस आपल्या मित्रांना सांगितला असता त्यांनी त्यांनी खंडेराज बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारा संचालित मैत्री दिनाच्या औचित्य साधून त्याचे केले उद्घाटन याप्रसंगी दामूअण्णा शिंगणे महाराज यांनी कीर्तनाची सेवा देऊन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दादासाहेब अवस्थी, मेहकर, अमोल आनंद महाराज तर अमोल आनंद महाराज यांनी या संस्थेला भरभरून आशीर्वाद दिला यावेळी वारकरी संप्रदायाचे तालुका व जिल्ह्याचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर अनाथालयाला महाराज शितोळे पुणे वारकरी संप्रदायातील लागणारे शिक्षण साहित्य, ह भ प डॉ.उन्हाळे व जयश्रीताई उन्हाळे खामगाव व्यवस्था, गजानन माळेकर यांनी शुद्ध पेयजल व्यवस्था,५३ विद्यार्थ्यांना देत आहेत वारकरी शालेय शिक्षणाचे धडे या अनाथालय यामध्ये राहण्याची व जेवणाची व्यवस्था सहदेव महाराज ठाकरे यांचे संपूर्ण कुटुंब करीत आहे तर वारकरी शिक्षणासाठी मानधन तत्वावर २ शिक्षक आळंदी येथून बोलवण्यात आले याप्रसंगी लोकप्रतिनिधींनी व जिल्ह्यातील मान्यवरांनी भेटी दिल्या