गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा:-तेल्हारा तालुक्यातील गाडेगांव येथे महाराष्ट्र राज्य प्राथ. शिक्षक समितीचे राज्य संघटक, अविरत विद्यादानाचे कार्य करून नामवंत विद्यार्थी घडविणारे जि. प शाळा गाडेगाव येथील विद्यार्थीप्रिय, कृतिशील आदर्श शिक्षक, शैक्षणिक, सामाजिक व आध्यत्मिक क्षेत्रात भरीव कार्य करणारे एक मनमिळाऊ, उत्तुंग व्यक्तिमत्व आदरणीय श्री. अशोकराव चौधरी सर आज सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्ताने जि. प शाळा गाडेगावचे वतीने निरोप व सत्कार सोहळा घेण्यात आला. या सोहळ्याचे अध्यक्ष गणेश तायडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून . केशव ताथोड माजी सरपंच , विजयराव टोहरे अध्यक्ष -जि. प. शिक्षक पतसंस्था अकोला , दादासाहेब वरठे माजी शिक्षण विस्तार अधिकारी , गोपालराव भुजबले सर माजी शिक्षण विस्तार अधिकारी , विशालराव घोगले संचालक-जि. प. शिक्षक पतसंस्था अकोला , राजेश देशमुख सचिव -शिक्षक समिती अकोला ,वोरोकार सर केंद्र प्रमुख दिपक साबळे रवी वासनकर, घोडेस्वार सर, परवेझ सर, मुख्याध्यापिका सुमन ठाकरे कोठे,छाया उमाळे ,अनुपमा घोगले .गजानन राऊत यांचे उपस्थिती होती.