मनोज बिरादार
ग्रामीण प्रतिनिधी नांदेड
देगलूर -अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयातील लोकप्रशासन विभाग व संशोधन केंद्राच्यावतीने ‘प्रशासनामा’ हे भित्तिपत्रक प्रकाशित केले जाते. विद्यार्थ्यांमध्ये लेखनाची आवड निर्माण व्हावी व विचार मंथन व लेखन कौशल्य विकसित व्हावे या उद्देशाने भितीपत्रक चालविले जाते.
प्रजासत्ताक दिन व राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त तयार केलेल्या विशेषांकाचे
देगलूर-बिलोली विधानसभेचे आ. जितेशभाऊ अंतापूरकर
यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. प्रस्तुत अंकाचे संपादक मंडळात पुजा ताटे
, गोपिका पाटील,
कोमल कांबळे,
विद्या बोईनवाड व
सानिका पपुलवार या विद्यार्थीनीनी काम केले.
याप्रसंगी अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेम्बरेकर , देगलूर उपविभागीयअधिकारी अनुप पाटील, अडत व्यापारी शिक्षणसंस्थेचे उपाध्यक्ष जनार्धन चिद्रावार,कोषाध्यक्ष विलास तोटावार , कार्यकारिणी सदस्य
रविंद्र अप्पा द्याडे , चंद्रकांत नारलावार,विजय उनग्रतवार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ , उपप्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार , उपप्राचार्य एम.एम. चमकुडे पटेल, उपप्राचार्य डॉ.व्ही.जी.शेरीकर,कार्यालय
अधीक्षक गोविंद जोशी, लोकप्रशासन विभाग प्रमुख डॉ. बी. आर. कत्तुरवार , डॉ. संजय देबडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.


