राजपाल बनसोड
तालुका प्रतिनिधी दिग्रस
दिग्रस : दिग्रस पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या भागांमध्ये 13 वर्षीय बालिका घरात एकटी असताना त्याच गावातील 24 वर्षीय तरुणाने घरात प्रवेश करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना काल दुपारी घडली असून यासंदर्भात दिग्रस पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. 13 वर्षीय ही बालिका आपल्या घरात एकटी होती आणि तिच्यासोबत तिची आजी देखील होती मात्र आधी कामानिमित्त बाहेर गेली होती तर तिची आई वडील हे शेतीच्या कामासाठी शेतात गेले होते. ही संधी आरोपी गोवर्धन शंकर चव्हाण राहणार साखरा याने येऊन तिच्यावर अत्याचार केला. ( एक दिवसाचा पीसीआर – याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ आरोपींना ताब्यात घेतले. आणि त्याचा एका दिवसाचा पीसीआर घेतला त्याच्या विरोधात वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हे नोंदविले असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडव करीत आहे.








