योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर
चंद्रपूर (१८ जुलै)- अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तालुका चिमूरच्या वतीने धनराजभाऊ मुंगले यांच्या पक्ष प्रवेशानंतर प्रथम आगमनाच्या निमित्ताने तालुका काँग्रेस कमिटी कडून स्वागत समारंभ आणि सत्कारचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी चिमूरचे आराध्य दैवत श्रीहरी बालाजी महाराजांचे दर्शन घेऊन भाऊंनी पक्ष कार्यालयामध्ये शोषित वंचितांचा आणि दीनदलितांच्या आवाज उठवणारे थोर समाज सुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपस्थित मान्यवर सर्वश्री भिमरावजी ठावरी ज्येष्ठ नेते, तुषारभाऊ शिंदे माजी नगर परिषद उपाध्यक्ष, विलासभाऊ डांगे माजी जिल्हा परिषद सदस्य, कमलेशभाऊ बांबोडे, कृष्णाजी तपासे, बंडूभाऊ पराते, यशवंतभाऊ वाघे माजी सरपंच नेरी, विलास मेहेरकुरे, प्रदीप तळवेकर, अमोल गजभिये, सुखदेव ढोणे, संजय सोनवणे, योगेश लाखे, संदिप कावरे, देवानंद गावंडे, मनोहर धापटे, माधवजी पिसे, शंकर माहुरे, डॉ. सुनील पिसे, राजू पिसे, मंगेश चांदेकर, गजानन चांदेकर, विनोद सातपुते तसेच पक्षाचे ज्येष्ठ नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)