अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
दि 16 जुलै रोजी मालेगांव येथील पंचायत समिती सभागृहात लोकमत तर्फे आयोजित भव्य रक्तदान शिबिर ठेवण्यात आले होते त्यात 31 जणांनी रक्तदान केले.लोकमत चे संपादक संस्थापक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात भव्य रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे 2 जुलै पासून हे रक्तदान शिबिर सुरू करण्यात आले आहे.मालेगांव येथे पंचायत समिती सभागृहात हे शिबिर 15 जुलै रोजी ठेवण्यात आले होते. यावेंळी मालेगांव चे तहसीलदार रवी काळे, गटविकास अधिकारी श्रनिवास पद्मावार भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे रामेश्वर अवचार आ अमित झनक, जिल्हा परिषद सदस्य शामभाऊ बढे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप जाधव, आशिष तिवारी, प्रदीप सावले, गणेश उंडाळ, भागवत मापारी, अभि घुगे, ज्ञानेश्वर आघाव, अभि देवकते, यांनी भेट दिल्या यावेळी पंचायत समिती कर्मचारी, शिवराज व्यायाम शाळा, विघनहर्ता गणेश मंडळ, भूमीपुत्र शेतकरी संघटना, शिवाशक्ती गनेश मंडळ, जैन संगटना, विदर्भ पटवारी संघ आदिनि सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोकमत चे तालुका प्रतिनिधी अमोल कल्याणकर यांनी प्रयत्न केले.











