योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर
नागभीड (15 जुलै) :- त्रिशरण एनलॉरमेंट फाउंडेशन पुणेव्दारे विकास दूत प्रकल्प अंतर्गत “एक आठवण आपल्या दारी” हा उपक्रम कोसंबी गवळी येथे राबविण्यात आला.यामध्ये कोरोना काळामध्ये तथा कोरोना आजारामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ बुधवारला जिल्हा समन्वयक संदीप सुखदेवे तथा तालुका समन्वयक सचिन कालेश्वर यांच्या मार्गदर्शनात वृक्षारोपण करण्यात आले.
यामध्ये श्रीहरी हेमने,राजेश्वर चौधरी,सुधाकर लूटे,राघोजी दडमल,पंढरी रंदये यांचे कोरोना काळात निधन झाले त्यांच्या स्मरणार्थ जासवंद, मोगरा,शेवंती,पपई,आवडा, गोडनिंब,आंबा,मनीप्लान्ट इत्यादी प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमाला संजय गजपुरे जि. प.सदस्य, श्री धांदे मुख्याध्यापक शा. आ.शाळा, श्री पाटील वनरक्षक, दिलीप रंदये सरपंच, संदीप हेमने उपसरपंच तथा विकास दूत, मुळनकर ग्राम सेवक, श्री भोयर सर जी.प.शाळा, श्री चव्हाण तलाठी, गिरी सर, कैलास रंदये ग्रा.प.सदस्य, ज्योतीताई उईके ग्रा.प.सदस्य, शिल्पा धोंगडे ग्रा.प.सदस्य, चतुराबाई दडमल अंगणवाडी सेविका, रूपा दडमल अंगणवाडी सेविका, विजय उईके, मच्छीन्द्र चांनोडे, गुरुदेव नागापुरे, तसेच मृतकांच्या कुटुंबातील सदस्य कार्यक्रमाला उपस्थित होते