मुंबई : बाळासाहेब ठाकरेंनी, प्रबोधनकार ठाकरेंनी ज्या ठाकरे नावाला महाराष्ट्रात मोठे केले त्याला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे कलंक लावण्याचे काम केले आहे. उद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसांवर नाव ठेवतायेत. कारण आदित्य ठाकरे जेलमध्ये जाणार आहे हे माहिती आहे. आदूबाळ लवकरच आर्थररोड जेलमध्ये जाणार आहे अशा शब्दात भाजपा आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. आमदार नितेश राणे म्हणाले की, सुशांतसिंग राजपूतचे चूक काय? दिशा सालियनच्या मृत्यूला जबाबदार कोण? ज्या ज्या लोकांनी उद्धव ठाकरेंच्या विचाराला विरोध केला त्यांना मारून टाकण्याचे आणि त्यांचे कार्यालय तोडण्याचे काम केले. ३९ वर्ष आम्ही शिवसेनेत होतो. बाळासाहेबांना शेवटच्या दिवसात कसा त्रास दिला हे पुराव्यासकट महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणू. उद्धव ठाकरेंनी यापुढे जर देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली तर याद राखावे असा इशारा त्यांनी दिला.
तसेच बाळासाहेबांना म्हातारा म्हणून उल्लेख करायचे. बाळासाहेबांना प्राण्याची उपमा देऊन हाक मारायचे हे मी शपथ घेऊन सांगतो. देवेंद्र फडणवीसांनी रक्ताच्या भावापेक्षा जास्त उद्धव ठाकरेंना सांभाळले. मातोश्री २ च्या परवानगी कुणी आणून दिल्या. २०१४-१९ काळात उद्धव ठाकरेंचे लाड पुरवले. रक्ताच्या भावाची काय अवस्था उद्धव ठाकरेंनी केली हे आम्ही महाराष्ट्राला सांगितले तर जनता चप्पलाने मारेल. नीच प्रवृत्तीचा व्यक्ती दुसऱ्याला कलंक लावतो. बाळासाहेबांच्या भाषेत काँग्रेससोबत जाणारे हिजडे आहेत. सर्व शासकीय यंत्रणा बाजूला ठेव, आम्ही कलानगरमध्ये येऊन उभे राहतो दाखव तुझी मर्दानगी असंही आमदार नितेश राणेंनी म्हटलं. नागपूरच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांची क्लिप लोकांना ऐकवत अरे तुमच्या नागपूरला कलंक आहे हा.. नाही नाही नाही म्हणजे हो हो हो असा त्याचा अर्थ. सहन होत नाही व सांगताही येत नाही, अशी फडणवीस यांची स्थिती झाली आहे, असे काय हे नागपूरवर कलंक आहे. शिवसेनेच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या घरी धाडी टाकून धमकावले जात आहे. तुरुंगात टाकले जात आहे. हे आता चालणार नाही. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. तुम्ही मनमानी कराल तर छत्रपतींच्या संस्काराची तलवार तुमच्यावर चालवावी लागेल असा इशारा देत ठाकरेंनी फडणवीसांवर बोचरी टीका केली होती.