यवतमाळ : जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत अकोला येथे होणाऱ्या राज्यस्तरीय टूर्नामेंटचे सीनियर कॅटीगिरी विद्यार्थी व विद्यार्थिनींचे तसेच यवतमाळ जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अंतर्गत नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय टूर्नामेंटचे १४ व १७ वयोगटात तथा सीनियर विद्यार्थी व विद्यार्थिनींचे ट्रायल १५ जानेवारी रोजी तालुका क्रीडा संकुल वणी व कन्या शाळा मारेगाव येथे होणार असल्याचे यवतमाळ जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष गौरीशंकर खुराणा यांनी कळविले आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातील शाळा तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या खेळाचा सर्वांगीण विकास होऊन त्यांना जिल्हा, विदर्भ तथा राज्यस्तरीय विदर्भ टेनिस क्रिकेट बॉल स्पर्धेत भाग घेता यावा यासाठी टेनिस क्रिकेट बॉल असोसिएशन तर्फे राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन नागपूर येथे २७ ते २९जानेवारी रोजी करण्यात आले असुन त्यांच्या गुणवत्तेनुसार निवड केली जाणार आहे. यासाठी १५ जानेवारी रोजी वणी येथील क्रीडा संकुल तर मारेगाव येथील कन्या शाळेत सकाळी आठ ते बारा आणि दुपारी चार ते सहा वाजे दरम्यान इच्छुकांची ट्रायल घेतली जाणार आहे. राज्यस्तरीय टूर्नामेंटची फी प्रति विद्यार्थी पाच हजार रुपये राहणार असून इच्छुकांनी स्वतःची क्रिकेट साहित्य घेऊन निवड प्रक्रिया होणार असलेल्या ठिकाणी वेळेवर हजर राहावे असे आवाहन यवतमाळ जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष गौरीशंकर खुराणा, यवतमाळ जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन सचिव गौतम जीवने तसेच मारेगाव तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन सचिव समीर कुडमेथे व आयोजकांनी केले आहे.