राजरत्न जाधव
जिल्हा प्रतिनिधी पालघर
पालघर : बोईसर परिसरात ठीक ठिकाणी कचऱ्याचे ढीग लागलेले दिसून येत आहेत. त्यामुळे ते कुचून रोगराई पसरण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे बोईसर परिसरात कचरा रोजचा रोज न उचलता तो जागेवरच पडलेला दिसून येतो. परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी करून देखील हा कचरा उचलला जात नाही गणेश नगर रामचंद्र नगर राणी शेगाव रोड रस्त्यावरील कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून. रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे. परंतु बोईसर ग्रामपंचायतचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साचते त्यामुळे कचरा कुचून रोगराई पसरण्याची शक्यता वाढली असून याकडे त्वरित लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकाकडून बोलले जात आहे.