नवी दिल्ली : केंद्रीय भूपृष्ठ व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना काल राजधानी नवी दिल्लीत सार्वजनिक वाचन कक्ष (नाशिक) तर्फे कार्यक्षम संसदपटू पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारांतर्गत शाल, स्मृतीचिन्ह, पुणेरी पगडी आणि 50 हजार रुपयांची मनीऑर्डर देण्याची परंपरा सुरू झाली असून प्रथम पुरस्कार केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी खासदार सुभाष भामरे यांनी गडकरींना पुणेरी पगडी घातली, त्याच खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी त्यांना येवले यांची शाल भेट दिली. यासोबतच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 50 हजार रुपयांच्या बक्षीस रकमेतून साडेचार लाख रुपयांचे योगदान देताना सार्वजनिक वाचन कक्ष, नाशिकला 5 लाख रुपयांची देणगी जाहीर केली. तसेच महाराष्ट्रातील आयटीआय व अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा देऊन त्यांना पाच लाख रुपयांचे बक्षीस द्यावे, असेही सांगितले.