अविनाश पोहरे / ब्युरो चिफ
रासायनिक खतांचा व किटकनाशकांचा वापर वाढला असुन याचे दुष्परिणाम अन्नधान्य उत्पादनातुन मानवाचे आरोग्यावर तसेच पर्यावरणावरही दिसून येत आहेत. व याचा विपरीत परिणाम मानवाचे आरोग्यवर होत चालला आहे.परंतु निरोगी व ऊत्तम आरोग्य लाभण्यासाठी ऊत्तम आहार लागतो.याकरिता पातुर तालुक्यातील शेतकरी गटांनी ‘जैविक शेती’ चा पर्याय निवडला आहे.
तसेच महाराष्ट्र शासनाने जैविक शेतीला चालना देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची स्थापना केली आहे. पातुर तालुक्यातील शेतकरी गटांनी जैविक पद्धतीने पिकविलेल्या उत्पादनांचे क्लिनींग, ग्रेडिंग विक्री व संकलन करण्यासाठी आज पातुर येथे दि.06/06/2021 रोजी शेतमाऊली शेतकरी जैविक शेती मिशन उत्पादक कंपनीचा भुमीपुजन सोहळा थाटात पार पडला. अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन व सर्ग विकास समिती अकोला अंतर्गत ‘ महासंघ ऑरगॅनिक मिशन’ या नावाने महासंघ स्थापन झाला असुन महासंघातील ३७ शेतकरी उत्पादक कंपन्यांपैकी शेतमाऊली शेतकरी उत्पादक कंपनी ही एक कंपनी असुन पातुर येथील समाधानाचं शेतं येथे कंपनीचा भुमीपुजन सोहळा पार पडला जैविक महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पोहरे तसेच मान्यवरांचे हस्ते हा भुमीपुजन सोहळा थाटात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्रकल्प संचालक आरीफ शहा तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पोहरे उपस्थित होते.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन माजी कृषी अधिकारी कुवरसिंग मोहने सर,पातुरचे तहसीलदार दिपक बाजड साहेब,तालुका कृषी अधिकारी धनंजय शेटे साहेब जैविक मिशनचे आशिष मुदावाडकर यांची उपस्थिती लाभली.तसेच या कार्यक्रमास महासंघाचे पदाधिकारी तसेच कंपनीचे अध्यक्ष सचिन ढोणे,सचिव विनोद क्षिरसागर तसेच संचालक मंडळाचे प्रभुदास बोंबटकार, प्रल्हाद खोकले,अरुण अत्तरकार, विश्वनाथ सावंत,दिनेश पजई, सचिन फेंड,अरविंद चव्हाण,हरीष टप्पे,सौ.माधुरी ढोणे तसेच कंपनीचे सभासद शेतकरी व तज्ञ प्रशिक्षक धिरज धोत्रे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन शेतकरी उत्पादक कंपनीचे सचिन ढोणे यांनी केले.आभार प्रर्दशन श्री विनोद क्षिरसागर यांनी केले.