अजिंक्य मेडशीकर
मालेगाव तालुका प्रतिनिधी
मालेगाव तालुक्यातील मेडशी ग्रामपंचायत कार्यालयात शिवराज्याभिषेक सोहळा दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्राम पंचायत कार्यालयावर भगवा ध्वज फडकविण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे आणि भगव्या ध्वजाचे विधिवत पूजन पंचायत समिती सदस्या कौशल्याबाई साठे, सरपंच शेख जमिरभाई यांच्या हस्ते यांच्या आले. याप्रसंगी नव्याने सैन्यात भरती झालेला तरुण शेख इम्रान शेख युनूस आणि सहायक पोलिस निरीक्षपदी निवड झाल्याबद्दल सुनील तायडे या दोघांचा सत्कर मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचयत लिपिक शेख जावेद यांनी केले. याप्रसंगी उपसरपंच सोनाली मंत्री, ग्राम पंचायत सदस्य मुलचद चव्हाण,अमोल तायडे, शांताबाई प्रकाश तायडे, भग्गो रमजान गौरे, सौ संध्याताई भगवानराव घुगे, सौ मीरा ज्ञानेश्वर मुंढे, सौ पूजा जगदिश राठोड,कैलास ढाले, ग्राम पंचायत सदस्यांसह ज्ञानेश्वर मुंढे, सुभाष तायडे, प्रसाद पाठक,प्रशांत घुगे,नितीन तायडे, बाबू डाखोरे, उमेश तायडे,संजय भागवत, बुराण पठाण,पांडुरंग मांडवगडे,युसुप पठाण, सोहेल पठाण,सलमान पठाण, ग्राम पंचायत कर्मचारी शेख जावेद,बाळु घुगे,दत्ता काळे,मुकेश चव्हाण,सर्वेश खंडेलवाल, राजकुमार राठोड आदी ग्राम पंचायत कर्मचाऱ्याची उपस्थिती होती


