किसन टाव्हरे
ग्रामीण प्रतींनिधी आंबेगाव
आळेफाटा (ता. जुन्नर) – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषदेचा भव्य व गौरवशाली कार्यक्रम आळेफाटा येथे यशस्वीरीत्या पार पडला. या कार्यक्रमाला जुन्नर, आंबेगाव, खेड, पारनेर या तालुक्यांतील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शान वाढवली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय अध्यक्ष मधुसूदनजी कुलते होते. तर संपूर्ण नियोजन जुन्नर तालुका कोअर कमिटीने अतिशय चोखपणे पार पाडले. संयोजनबद्ध आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या कार्यक्रमाबद्दल सर्वत्र कौतुकाचे सूर उमटले.पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुनील मिरगणे असे म्हणाले की आजच्या बदलत्या तंत्रज्ञाच्या युगात माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे पत्रकारासमोर नवनवीन आव्हाने उभी राहतात तरी या काळात सत्य , प्रामाणिकपणा, पारदर्शक पणा आणि जनतेच्या विश्वासाला जपणे हे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. या वेळी राज्य उपाध्यक्ष प्रवीणजी शिंदे, आंबेगाव तालुका अध्यक्ष किसन टाव्हरे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुनीलजी मिरगणे भारती हांडे, शंकर डांगले, नेटके, अहिल्यानगर अध्यक्ष सचिन कोकाटे यांच्यासह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमातून पत्रकारिता क्षेत्रातील विविध मुद्द्यांवर चर्चा होऊन संघटनात्मक बळकटीचा संदेश देण्यात आला. उपस्थित पत्रकारांनी कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत संयोजकांचे आभार मानले.


