रितेश टीलावत
जिल्हा प्रतिनिधी अकोला
महात्मा फुले शिक्षण संस्था संचालित सहदेवराव भोपळे विद्यालय व स्व.दादासाहेब भोपळे स्मृती प्रतिष्ठान द्वारा आयोजित स्व.सहदेवराव उपाख्य दादासाहेब भोपळे यांच्या ९६ वा जयंती उत्सव समारोहाचे आयोजन करण्या त आले होते. या कार्यक्रमा च्या अध्यक्षस्थानी श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष केशवराव मेतकर तर प्रमुख उद्घाटक म्हणून विधान परिषदेचे सदस्य आमदार अमोल मिटकरी यांची उपस्थिती होती.या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व स्व. सहदेवराव उपाख्य दादासाहेब भोपळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या जयंती सोहळ्याचे औचित्य साधून सहदेवराव भोपळे कनिष्ठ महाविद्यालय येथे शैक्षणिक वर्ष २०२५ पासून नियोजित विज्ञान शाखेचा वर्गखोली समर्पण सोहळा उद्घाटक आमदार अमोल मिटकरी यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थि तीत शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड.गजानन पुंडकर, नॅशनल मिलिटरी स्कूलचे अध्यक्ष महेश गणगणे,महात्मा फुलेशिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ संचालक सत्यदेव गिऱ्हे, कोषाध्यक्ष पुखराज राठी,जेष्ठ संचालिका अन्नपूर्णाबाई बंड,मिरख्वाजा उर्दू वेलफेअर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शोएबअली
मिरसाहेब, हिवरखेड कृषी प्रकिया संस्थेचे संचालक गजानन उंबरकार,अमरावती विभागीय विज्ञान मंडळाचे अध्यक्ष डॉ.रवींद्र भास्कर, महात्मा फुले शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रमोद भोपळे, सुनील राऊत, संचालक वीरेंद्र भोपळे, प्रकाश खोब्रागडे,संचालिका साधना ताई भोपळे,संस्था मार्गदर्शक धैर्यशील भोपळे, संस्थेचे आजीवन सदस्य सुरेश गिऱ्हे,अशोक वानखडे, सहकारी सोसायटीचे माजी सभापती राजेंद्र भोपळे, मोहम्मद बदरुजमा,जागर मंचचे संयोजक तुळशीदास खिरोडकार,संचालक अनिरुद्ध भोपळे,तेल्हारा तालुका विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष विलास घुंगड,आदी मान्यवरांसह पालक प्रतिनिधी, पत्रकार बांधव उपस्थित होते.या जयंती सोहळ्याचे प्रास्ता विक संस्थेचे युवा संचालक प्रा. कौस्तुभ भोपळे यांनी केले. त्यात त्यांनी स्व. सहदेवराव उपाख्य दादासाहेब भोपळे यांच्या जीवनपटातील निवडक प्रसंग उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांच्या समोर उलगडून दिले व त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कर्तृत्वाच्या स्मृतीना उजाळा देण्याचा प्रयत्न केला. या जयंती सोहळ्याचे प्रमुख निमंत्रक संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार भोपळे व संस्थेचे कार्यवाह
श्यामशील भोपळे व सह कार्यवाह स्नेहल भोपळे यांनी उपस्थित मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या दिनाचे औचित्य साधून ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमा मध्ये सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्या लयाचा तालुक्यातून प्रथम क्रमांक आल्याबद्दल व जिल्हास्तरावर नामांकना साठी पात्र झाल्याबद्दल शिक्षण विभागाचे प्रतिनिधी केंद्रप्रमुख प्रमोद पोके यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक संतोषकुमार राऊत व पर्यवेक्षक गणेश खानझोडे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी आमदार अमोल मिटकरी यांनी शालेय जीवनातील स्व:आठवणीला उजाळा देऊन शिक्षणाचे महत्व प्रतिपादन केले. यशाच्या वाटचालीकडे जिद्द,परिश्रम व संयम नेऊ शकतो, हा कानमंत्र विद्यार्थ्यांना दिला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.या जयंती सोहळ्याचे संचलन प्रा.डॉ. शंकर दुनघव,प्रा. डॉ.मयूर लहाने व आभार प्रदर्शन प्राचार्य संतोषकुमार राऊत यांनी केले.या जयंती सोह ळ्याच्या यशस्वितेसाठी शाळेतील शिक्षक शिक्षिका व कर्मचारी वृंद यांनी अथक परिश्रम घेतले.


