रवि राठोड
ग्रामीण प्रतिनिधी वाकान.
महागांव : तालुक्यातील पोखरी ईजारा.पेढी.सुधाकर नगर या ठिकाणी २२५ सघमी.पाणीसाठा तलाव तयार करन्यात आला आहे.या तलावातील पाझर पाणी लगतच्या शेतशिवारात जात असल्याने १५ वर्षांपासून येथील शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे.पोखरी येथील शेतकरी कीशन भिका पवार यांनी या संदर्भात पाटबंधारे विभागासह जिल्हा प्रशासनाकडे वांरवार तक्रार दिली मात्र त्या तक्रारीनुसार कुठलीही दखल घेन्यात आली नसल्याने त्यांच्या शेतपिकाचे होणारे नुकसान कायमच राहीले आहे.कुटुंब उदरनिर्वाहासाठी असलेली शेती येथील पाझर तलावामुळे नुकसानीच्या सालोख्यात सापडल्याने शेतकऱ्यांच्या शेतपीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.या ठीकाणचे ओअर फलोरचे पाणी शेतात शिरून दरवर्षी शेतीचे नुकसान होत असल्याने या बाबत शेतकऱ्यांनी संबंधित विभागाकडे तक्रार दिली आहे मात्र हा प्रश्न निकाली निघाला नसल्यामुळे आणि शेतकऱ्यांचे शेत जमिनीचे नुकसान होत असल्याने शासनामार्फत ही जमीन भुसंपादन करून घेन्यात यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. या प्रकरणी तोडगा न निघाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा संबंधित शेतकऱ्यांनी दीला आहे.शासकीय यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांवर गंभीर परिस्थिती ओढवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.


