सुरेश नारायणे
तालुका प्रतिनिधी, नांदगाव
नांदगाव – विश्व नवकार दिवस नांदगाव येथे सकल जैन समाजाच्या वतीने ज ता का जैन धर्म शाळेत मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी नवकार महामंत्राचा जप उपस्थित असलेल्या शेकडो लोकांनी व विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी एक सुराने केल्यामुळे धार्मिक वातावरण तयार झाले होते भगवान महावीर जयंतीचे औचित्य साधत यात सर्व जाती-धर्माच्या नागरिकांनी सहभाग नोंदवला विधीज्ञ जयकुमार कासलीवाल व्याख्यानमाला अंतर्गत नवकार महामंत्र या विषयावर महामंत्र आराधक बालचंद छाजेड मालेगाव यांचे समायोचित व्याख्यान संपन्न झाले याप्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, चेतन पाटील, बाळासाहेब कवडे कृबासंचालक समाधान पाटील आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओसवाल भुवन प्रबंधक समितीचे अध्यक्ष दत्तराज छाजेड यांनी केले प्रमुख पाहुण्यांचा परिचय त्यांनी करून दिला याप्रसंगी ज्येष्ठविधीज्ञ जयकुमार कासलीवाल व प्रमुख वक्ते कर सल्लागार बालचंद छाजेड यांचा सत्कार सकल जैन समाजाच्या वतीने ख. दिगंबर जैन पंचायतीचे अध्यक्ष सुमेर कासलीवाल, महामंत्री महावीर ताराचंद पांडे, संघपती सुभाष लोढा, महामंत्री विजय चोपडा, ओसवाल भुवन प्रबंधक समितीचे अध्यक्ष दत्तराज छाजेड, महामंत्री सचिन पारख यांच्या हस्ते नवकार महामंत्राचे प्रतिमा देऊन करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सारिका पाटणी, सौ साधना काला, यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी आनंद काला, निलेश पाटणी, गणेश पारख, निलेश गंगवाल, निलेश लोढा, ललित काला , जे टी के इंग्लिश मीडियम स्कूल, स्व मि. भि. छाजेड विद्या मंदिर चे शिक्षक व विद्यार्थी आदीं सह सकल जैन समाजाच्या बांधवांनी विशेष प्रयत्न केले


