पत्रकारांना न्याय न मिळाल्यास आंदोलन इशारा.
रवि राठोड
ग्रामीण प्रतिनिधी वाकान.
महागांव:
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे 3 एप्रिल 2025 गुरुवार रोजी समता (पोस्टल ) ग्राउंड यवतमाळ येथे सभेसाठी आले असता .वृत्तांकन करण्यासाठी साम टी .व्ही .चे प्रतिनिधी संजय राठोड व टीव्ही 9 चे प्रतिनिधी विवेक गावंडे यांच्यावर पोलीस प्रशासना कडून जो अमानुष हल्ला धक्काबुक्की मारहाण करण्यात आली व त्यांना अपमानित करण्यात आले याचा निषेध महागांव तालुका मराठी पत्रकार संघ व जनआंदोलन संघर्ष समितीच्या वतीने निषेध नोदविला घटनेला जबाबदार अधिकारी कर्मचारी यांना त्वरित निलंबित करून या घटनेच्या सूत्रधारास शोध घेऊन सह आरोपी करा गुन्हे नोंद करण्यात यावे लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ अन्याय अत्याचारा विरुद्ध काम करणाऱ्या पत्रकार बांधवांवर अमानुष हल्ला धक्काबुक्की करणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करून त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या सूत्रधाराला शोधून सह आरोपी करण्यात यावे अन्यथा तालुकास्तरावर आंदोलन उभारू असे महागाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने व जन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने निषेध नोंदविला दरम्यान काही उचित प्रकार घडल्यास प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी अशा आशयाचे महागाव तालुका मराठी पत्रकार संघ व जन आंदोलन संघर्ष समिती यांच्या वतीने निवेदन देण्यात आले . यावेळी जन आंदोलन संघर्ष समितीचे संस्थापकीय अध्यक्ष जगदीशभाऊ नरवाडे ,महागाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय कोपरकर
उपाध्यक्ष सदानंद जाधव
सचिव राजतकुमार खाडे
मार्गदर्शक निलेश पाटील नरवाडे
शिवानंद राठोड ,मंचकराव गोरे,सय्यद मुद्दसिर,नरेंद्र नप्ते,श्रीकांत राऊत,ताह मिर्झा ,सचिन उबाळे ,बाळासाहेब देशमुख ,संदिप कदम,विजय सूर्यवंशी ,डॉ.अशोक राऊत,किशोर राऊत,धम्मानंद कावळे,कय्युम पठाण , मनोज सुरोशे यावेळी उपस्थित होते.


