दीपक बावने यांची गटविकास अधिकारी यांचे कडे तकरार
अनिस सुरैय्या
तालुका प्रतिनिधि महागांव
महागांव: महागांव तालुक्यातिल वाकोडी ग्राम पंचायत कार्यालय येथिल रोजगार सेवक वसिफ पठाण व सचिव तायडे मॅडम यांनी घरकुल बांधकाम सुरु करण्यासाठी १५०००,रुपयांची लाच घेतल्याची तकरार दिपक बावने यांनी गटविकास अधिकारी महागांव यांचे कडे केली आहे.या तकरारीतील संवीस्तर वृत्त असे की वाकोडी येथिल रहीवासी दिपक उकंडा बावने यांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत दिपक बावने यांची लाभार्थी म्हणुन निवड झाली आहे.परंतु मागील सहा महिन्यांनपासुन लाभार्थींचे घरकुल बांधकाम सुरु झाले नाही याबाबत ग्रा.पं चे सचिव व ग्रा.पं.चे रोजगार सेवक यांना विचारना केली असता.वाकोडी ग्रा.पं.चे रोजगार सेवक वसिफ पठाण ह्यांनी मला व सचिव तायडे मॅडम यांना १५०००,रुपये द्या त्यानंतर तुमचे बांधकाम सुरु करतो अन्यथा घरकुल विसरुन जाय असे धमकावले असल्याचे दीलेल्या तकरारीत सांगीतले आहे.त्यामुळे भिती पोटी मी लाच दिली व तसेच रोजगार सेवक वसिफ पठाण ह्यांनी दिपक बावने यांचे कडुन १५०००, रुपये लाच घेतली व लाच घेत असतांना ची व्हिडिओ रेकॉर्ड तकरारकर्त्यांकडे असल्याची तकरारीत नमुद आहे.त्यामुळे संबंधित सचिव तायडे मॅडम यांना निलंबित करावे व ग्रा.पं.चे रोजगार सेवक वसिफ पठाण यांना कायमचे कामावरुन काढुन टाकण्यात यावे अशी मागणी दिपक उकंडा बावने यांनी केली आहे.


